माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ : या कारणास्तव दोन वर्षांची शिक्षा


MLA Bachu Kadu sentenced to two years नाशिक : नाशिक महापालिका आयुत्तांवर हात उगारल्याप्रकरणात माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी 2017 साली दिव्यांगांच्या मागणीसाठी नाशिक महापालिकेत आंदोलन केलं होतं. यावेळी अभिषेक कृष्णा नावाच्या आयुक्तांवर बच्चू कडू यांनी हात उगारल्याचा आरोप आहे. यावेळी आयुक्त यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

दोन प्रकरणात झाली शिक्षा
नाशिक जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे, दमदाटी करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे अशा दोन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांना 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.

वरीष्ठ न्यायालयात दाद मागणार
न्यायालयाच्या या निर्णयावर बच्चू कडू म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, या निर्णयाविरुद्ध विरोधात आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागणार आहोत. कोर्टात एक बाजू ऐकली जाते परंतु अधिकार्‍यांनी काहीही खर्च केला नाही ही बाजू बघितली जात नाही, याचे दुःख असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. पत्र देऊनही आम्हालाही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन करण्यासाठी आलो होतो. आम्ही मौज मजा करायला आलो नव्हतो. ज्यांना हात-पाय, डोळे नाहीत, अशा दिव्यांग बांधवांच्या हक्काचा निधी हे अधिकारी खर्च करत नाहीत, म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं. आम्ही आंदोलन केलं म्हणून आम्हाला शिक्षा सुनावली. याउलट आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ का आली? याचा तपास करायला हवा. हे का तपासलं जात नाही?, असा प्रश्नही बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !