भुसावळात चौघा जुगार्यांना बाजारपेठ पोलिसांकडून अटक

भुसावळ : शहरातील निवृत्ती नगर भागातील काशी विश्वेश्वर मंदिरामागे मोकळ्या जागेत जुगाराचा डाव सुरू असताना बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता धाड टाकत चौघा जुगार्यांच्या मुसक्या आवळल्या. रजनीश शीतलदीन लोणे (39, रा.रींग रोड, गडकरी नगर, भुसावळ), अजय शिवकुमार यादव (30), सोनु बिरजु पासी (37),
रवींद्र माणिक बाविस्कर (37, तिन्ही रा.चमेली नगर, वांजोळा रोड, भुसावळ) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन हजारांची रोकड तसेच जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रवींद्र बिर्हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, बंटी कापडणे, अक्षय चव्हाण आदींनी केली. तपास नाईक किशोर महाजन करीत आहेत.


