यावलमध्ये उभ्या ट्रकमधुन विको टर्मरीकचे तीन लाखांचे कार्टूस लंपास

यावल : यावल-चोपडा रस्त्यावरील अक्षदा ढाब्यावर 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकमधुन विको टर्मरीक कंपनीचे सुमारे तीन लाख 12 हजार 453 रुपयाचे 22 कार्टून चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत ट्रक मालकाने यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल-चोपडा रस्त्यावरील व शहरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलल्या अक्षदा ढाब्यावर मध्यरात्रीच्या सुमारास मुक्कामास असलेला ट्रक (एम.एच.32 क्यु.4033) ची ताडपत्री अज्ञात चोरट्यांनी ापून त्यातील विको टर्मरीक कंपनीचे 22 कार्टून लांबवले.या प्रकरणी ट्रकमालक जयकुमार महादेवराव घोडीले (56, रा.टेकानाका, नागपुर) यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरटयांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनीता कोळपकर, हवालदर संजय तायडे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.


