ढोलकी न दिल्याने यावल शहरात 68 वर्षीय वृद्धास चौघांची मारहाण
A 68-year-old man was beaten up by four people in Yaval city यावल : शहरातील देशमुखवाडा भागातील विवरेवाले महाराज मंदिरात वाजवण्याकरिता ढोलकी न दिल्याच्या रागातून 68 वर्षीय वृद्ध इसमाला चौघांनी मारहाण केली होती. या प्रकरणी वृद्धाने दिलेल्या फिर्यादीनुसार यावल पोलिसात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
यावल शहरातील देशमुख वाडा भागातहू विवरेवाले महाराज मंदिरज्ञी श्रावण शंकर भील (68) गेल्यानंतर तेथे इंदूबाईचा नातू व त्याच्या सोबत तिघे आले व त्यांनी वृद्धास मंदिरातील ढोलक वाजवण्यासाठी मागितला असता त्यांनी नकार दिल्याच्या रागातून चौघांनी त्यांना मारहाण केली व लोखंडी पाईप त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. या प्रकरणी यावल पोलिसात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.



