भुसावळ परीसरात ‘महिला दिनी’ स्त्री शक्तीचा गौरव

भुसावळ विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन ः सामाजिक उपक्रमातून महिला शक्तीविषयी आदरभाव


भुसावळ : भुसावळ शहरासह परीसरातील सामाजिक संस्थांसह शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक महिला दिनाचै औचित्य साधून स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन बुधवार, 8 रोजी ठिकठिकाणी करण्यात आली. याप्रसंगी विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर मान्यवरांनी महिला शक्तीविषयी मनोगतातून आदरभाव व्यक्त केला.

भुसावळात योग वर्गातील महिलांचा गौरव
भुसावळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे भुसावळ शहरातील सहा योग वर्गातील सुमारे साठ महिलांचा सन्मानपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. भुसावळ येथील जामनेर रोड लगत असलेल्या किरण लोखंडे यांच्या निवासस्थानी गेल्या काही वर्षांपासून योगिनी योग वर्ग सुरू आहेत. पतंजली योगपीठ हरीद्वारद्वारे संचलित आणि पतंजली योग समिती, भुसावळ यांच्यातर्फे आयोजित योगिनी योग वर्गात महिलादिनी पहाटे सहा वाजता महिलांचा सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर योगिनी योग वर्गाच्या संचालिका महानंदा पाटील, किरण लोखंडे, संस्थाध्यक्ष डीके.पाटील, समन्वयक संजीव पाटील, सचिव डॉ.जगदीश पाटील, सदस्या सुरेखा पाटील, रंजना पाटील उपस्थित होत्या. प्रास्ताविकात संजीव पाटील यांनी संस्थेच्या विविधांगी उपक्रमांचा आढावा घेऊन डॉ. जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित महिला दिन कार्यक्रमाचा हेतू सांगितला. महानंदा पाटील, डॉ.जगदीश पाटील, डी.के.पाटील, रंजना पाटील यांनी महिला दिनाविषयी माहिती दिली. योग प्रशिक्षक राजश्री बादशाह यांनी सत्कारार्थी महिलांच्या यादीचे वाचन केले. यानंतर संतधाम योग वर्ग, योगिनी योग वर्ग, ओंकार योग वर्ग, तेरापंथ योग वर्ग, जळगाव नाका योग वर्ग, लक्ष्मी नगर योग वर्ग अशा सहा ठिकाणच्या योगवर्गातील सुमारे साठ महिलांचा सन्मानपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी योगिनी योग वर्ग संचालिका महानंदा पाटील, योग प्रशिक्षक वर्षा लोखंडे, अंजली वाघमारे, राजश्री बादशाह, मंदाकिनी केदारे, मीना राजपूत, हेमलता चौधरी, माला चौधरी तसेच योगवर्गाच्या सरिता बरडीया, पूनम सांखला, सरला निमानी, प्रणिता देशपांडे, प्रतिभा पाटील, शारदा धांडे, शीतल सावदेकर, पुष्पांजली बोंडे, पूजा चौधरी, अलका सपकाळे, राजश्री भारंबे, सीमा सैंदाणे, चेतना चौधरी, वंदना रत्नपारखी यांच्यासह महिलांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार योगिनी योग वर्ग संचालिका महानंदा पाटील यांनी मानले.

भालोद महाविद्यालयात स्त्री शक्तीचा सन्मान
भालोद : सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचालित कला व विज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे प्रा.डॉ.सुनील नेवे यांच्याकडून महिला भगिनींचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. यावेळी महिला भगिनी महिला क्रीडा मंडळ भुसावळ अध्यक्ष आरती चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती भोळे, प्रा.हेमलता कोल्हे, प्रा.शैलजा इंगळे, प्रा.डॉ.पी.डी.पाटील, प्राचार्य डॉ.के.जी.चौधरी, उपप्राचार्य मुकेश चौधरी, डॉ.जतीनकुमार मेढे, डॉ.अजय कोल्हे, डॉ.दिनेश पाटील, डॉ.पद्माकर सावळे उपस्थित होते.

श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : हिंदी सेवा मंडळ द्वारा संचलित श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय, भुसावळ आणि इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट 303 यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी स्त्रियांचे महत्त्व सांगून आजच्या काळातही स्त्री असुरक्षित आहे याबद्दल चिंता व्यक्त केली. प्रमुख वक्ता राकेश कुमार सिंह (नवी दिल्ली) यांनी विश्वगुरू बनणार्‍या भारताने सर्वप्रथम महिला सशक्तिकरणावर भर दिला पाहिजे, अस सांगितले. वक्त्यांचा परीचय इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष रुचिका शर्मा यांनी तर सूत्रसंचालन हिंदी महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.पूनम त्रिवेदी केले. प्रा.डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, डॉ.प्रवीण जाधव, हितेंद्र गुप्ता, प्रा.शिबा खान, प्रा.समता तायडे, यांनी परीश्रम घेतले.

ताप्ती पब्लीक स्कूल, भुसावळ
भुसावळ : ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य निना कटलर यांनी माल्यार्पण व द्वीपप्रज्वलन करुण कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रास्ताविक जतीन मोरे तर सूत्रसंचालन शेख यांनी केले. प्रसंगी विद्यार्थिनींनी नृत्य, गीत व ड्रामा सादर केला. माधुरी गाजरे, मनप्रीत कौर, सोफिया पिबोडी यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी मोहम्मद शेख, अर्जुन सनस, डॅनियल पवार, अकबर खान, अभिषेक राठोड, नितीन अडकमोल, विजय संकट, विनायक सुरवडकर, महेंद्र सूर्यवंशी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले. आभार डॅनियल पवार यांनी मानले.

कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, अँटीरैगिग समिती व आईसीसतर्फे बुधवारी जागतिक महिला दिननिमित्त भारतीय स्त्रीरत्न या विषयावर पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते उद्घाटन डॉ.सुषमा उमेश खानापूरकर यांनी केले. प्रसंगी दिवाणी न्यायाधीश हेमा पाटील, वकील संघाचे अध्यक्ष तुषार पाटील, अ‍ॅड.सुजाता वाघोदे, वरीष्ठ विधीत्ज्ञ कैझार भारमल उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डॉ.जान्हवी तळेगावकर यांनी केले. न्यायाधीश हेमा पाटील यांनी महिलांविषयक कायद्याची माहिती देत संस्कार आणि सामाजिक शिस्त यातूनच उद्याच्या सुसंस्कृत आणि सुदृढ समाजाची जडणघडण होणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.एस.के.अग्रवाल यांनी तर प्रा.नीता चोरडिया यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ.व्ही.एस.पाटील, वाय.डी.देसले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ.सरोज शुक्ला यांचे मार्गदर्शन लाभले.

संत मुक्ताई महिला ज्येष्ठ मंडळ, मुक्ताईनगर
मुक्ताईनगर : शहरातील पेंशनर भवनात संत मुक्ताई ज्येष्ठ महिला मंडळ व मुक्ताई ज्येष्ठ नागरीक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासदार रक्षा खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तनकार ह.भ.प.दुर्गा मराठे, संत मुक्ताई ज्येष्ठ महिला नागरीक मंडळाच्या अध्यक्ष सुशीला निळे, सचिव राजकन्या जोगी, कोषाध्यक्ष आशालता सोनार, विजया बोंडे, पद्मावती महल्ले, मैनाबाई जोगी, प्रा.नंदा पाटील, ब्रह्मक्षत्रीय, भाजपा तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, शहराध्यक्ष पंकज कोळी, ज्येष्ठ सल्लागार वसंतराव चौधरी, मुक्ताई ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष आर.टी.जोगी, सचिव तू.ब.पाटील, वसंत बोंडे, रघुनाथ काकडे, मधुकर महल्ले , दत्तात्रय श्रीखंडे यांचे सह 80 महिला व पुरुष ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.

दीपनगरात जागतिक महिला दिन उत्साहात
दीपनगर : वीजनिर्मिती केंद्रातील महिला अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी दीपनगर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. यानिमित्त आठवडाभर वसाहतीत विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.स्वच्छता अभिमान सायकल रॅली, महिलांसाठी किक्रेट सामने, पथनाट्ये, सांस्कृतिक कार्यक्रम झाले.अध्यक्षस्थानी दीपनगरचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.मंगला जंगले, उपमुख्य अभियंता मनोहर तायडे, संतोष वकारे, उपमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी मुकेश मेश्राम उपस्थित होते. चित्रा पाटील यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रतीक्षा बोरोले यांनी मानले. समितीच्या अध्यक्ष डॉ.रोहिणी गायकवाड, मीनाक्षी सुरवाडे, शर्वरी देशमुख, जयश्री सपकाळे, चेतना नारखेडे, विद्या बुंदेले यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !