अंतर्नाद प्रतिष्ठानच्या महावक्तृत्व स्पर्धेत झाले शिवरायांच्या विविध पैलूंचे दर्शन
शिवजयंती निमित्त जळगाव जिल्ह्यास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेत 319 स्पर्धकांचा सहभाग
भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंतीच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात महावक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील 319 स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रथम फेरी ऑनलाईन घेण्यात आली. अंतिम फेरी बक्षीस वितरणा पूर्वी घेण्यात आली होती. यंदा स्पर्धेचे सहावे वर्ष होते. चार गटातील 19 विजेत्यासह सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक यांना रविवारी गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी भुसावळ नगरपरीषदेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघ अध्यक्ष रघुनाथ अप्पा सोनवणे, प्रा.डॉ.भाग्यश्री भंगाळे, भुसावळ नगरपरीषद माजी शिक्षण सभापती मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक दीपक धांडे यांची उपस्थिती होती.
यांनी पाहिले परीक्षक म्हणून काम
शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित वकृत्व स्पर्धेतील चार गटातील प्रत्येकी 13 विद्यार्थी यानुसार 52 विद्यार्थ्यांची अंतिम फेरी नहाटा महाविद्यालय लायब्ररी हॉल येथे रविवारी पार पडली. प्रथम आणि द्वितीय फेरीत परीक्षक म्हणून दिनकर जावळे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, मीरा जंगले, सचिन धालपे, बी एन जाधव, डॉ.विश्वजीत सिसोदिया, राधेश्याम पाटील, दीपक पाटील, निशा पाटील, सुरेश अहिरे, शैलेंद्र वासकर यांनी काम पाहिले. अंतिम फेरी झाल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख शैलेंद्र महाजन यांनी केले. शिक्षण आणि सामाजीक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल राजेंद्र जावळे, अमितकुमार पाटील आणि प्रदीप सोनवणे यांचा अंतर्नादतर्फे सन्मानपत्र देउन गौरव करण्यात आला. के.नारखेडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली, त्यानंतर स्पर्धेच्या 15 परीक्षकांना सन्मानित करण्यात आले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी तर आभार स्पर्धा समन्वयक राहुल भारंबे यांनी मानले. सन्मानपत्राचे वाचन तेजेंद्र महाजन, ज्ञानेश्वर घुले आणि कुंदन वायकोळे यांनी केले. यशस्वीतेसाठी सह समन्वयक अमित चौधरी, डॉ.संजय भटकर, प्रा.श्याम दुसाने, समाधान जाधव, राजू वारके, ललित महाजन, सचिन पाटील, भूषण झोपे, रवींद्र पाटील आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.
गटनिहाय अंतिम फेरीतील विजेते- पहिला गट (इयत्ता पहिल-दुसरी)- प्रथम पूर्वा राहुल भारंबे (तु.स.झोपे गुरुजी प्रा.विद्या मंदिर, भुसावळ), द्वितीय कुणाल कशोर बडगुजर (जि.प प्रा शाळा कढोली), तृतीय गार्गी ललितकुमार भोळे (सेंट अलॉयसेस शाळा, भुसावळ), उत्तेजनार्थ – अमीना तौसिफ़ शेख ( सेंट अलॉयसेस शाळा, भुसावळ )
द्वितीय गट (इयत्ता तिसरी-चौथी)- प्रथम ज्ञानेश्वरी धनराज कोळी (जि.प.शाळा, सांगवी खुर्द ), द्वितीय श्रेया गोपाळ मोरे (पंकज विद्यालय, चोपडा), तृतीय कुणाल दीपक धनगर (जि.प शाळा सांगवी खुर्द ), उत्तेजनार्थ- नयना समाधान पाटील (अलोक पब्लिक स्कुल), स्तव्य कमलेश शामकुवर (पोदार इंटरनॅशनल स्कुल)
तृतीय गट (इयत्ता पाचवी-सातवी)- प्रथम हंसिका नरेंद्र महाले (सेंट अलॉयसेस स्कुल, भुसावळ), द्वितीय योगिता समाधान पाटील (जि.प शाळा बोरवेल खुर्द ), तृतीय विधी गजाजन किनगे (काशिनाथ पलोद स्कुल, जळगाव), उत्तेजनार्थ- दीपक गोपाळ सोनार (दादासाहेब आरजी झांबरे विद्यालय, भुसावळ), सिद्धी मंगलेश पाटील (सेंट अलॉयसेस हायस्कुल, भुसावळ )
चतुर्थ गट (इयत्ता आठवी-बारावी)- प्रथम कोमल चंद्रकांत शिरसाळे (दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय, सुनसगाव), द्वितीय वेदिका गोपाळ सपकाळे (जे.ई.स्कुल, मुक्ताईनगर), तृतीय कुलदीप रवींद्र पाटील (सेंट अलॉयसेस स्कुल, भुसावळ), उत्तेजनार्थ- टीना रवींद्र नंदवणे (सेंट अलॉयसीस स्कूल, भुसावळ), गार्गी नितीन चौधरी (दादासाहेब आर.जी.झांबरे ,विद्यालय, भुसावळ).
