अयोध्या नगरात सॉप्टवेअर अभियंत्यांकडे धाडसी घरफोडी


House burglary in Ayodhya town of Jalgaon: 50 thousand stolen जळगाव : शहरातील आयोध्या नगरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 49 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी बुधवारी दुपारी चार वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
प्रवीण सुधाकर इंगळे (34, अयोध्या नगर, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून सॉप्टवेअर इंजिनिअर आहेत. शनिवार, 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ते घर बंद करून कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. घरातील लॅपटॉप, मोबाईल, रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण 49 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. चोरीचा हा प्रकार बुधवारी सकाळी 11 वाजता उघडकीला आला. या प्रकरणी इंगळे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !