जळगावात सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक महिलेचा विनयभंग


A woman security guard in a super multispeciality hospital was molested in Jalgaon जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा सन्मान होत असतानाच जळगावातील एका नामांकीत रुग्णालयातील सुरक्षारक्षक असलेल्या महिलेने अनैतिक संबंध ठेवावेत म्हणून हॉस्पीटलच्या सुपरवायझरने विनयभंग केल्याची संतापजनक घटना बुधवार, 8 मार्च रोजी घडली. या प्रकरणी संशयित खालीद अहमद बुर्‍हाणोद्दीन (जळगाव) विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कामावरून काढून टाकण्याची धमकी
31 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या नामांकीत हॉस्पीटलमध्ये सुरक्षा रक्ष असून संशयित सुपरवायझर खालीद अहमद बुर्‍हानोददीन काझी याने थम मशीनला थम करू दिले नाही तसेच वेळोवेळी अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करीत मानसिक त्रास दिला तसेच माझ्याशी संबंध ठेव नाही तर तुला मी कामावर ठेवणार नाही, असे बोलून पीडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकरणी सुपरवायझर खालीद काझी विरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक अलका शिंदे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !