बोदवडमध्ये जिनिंगची भिंत फोडत 65 हजारांच्या मुद्देमालावर डल्ला


बोदवड : शहरातील मनुर रोडवरील शिव जिनिंगमधून चोरट्यांनी 65 हजारांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. ही घटना 1 रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील जामठी रोडवरील शिव जिंनिंग व प्रेसिंग मध्ये 1 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास जिनींगची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी 65 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यात रूई काढलेल्या तीन कपास गठाणी व गठाण वाहतूक करण्याची ट्रॉली असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमालाचा समावेश आहे. याबाबत रमेश चंद्रमोहनलाल अग्रवाल (70 रा.बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांचा मुलगा मयुर अग्रवाल हे दोन्ही व्यापार करीत असून यात दोन्ही पार्टनर आहेत. चोरी झाल्याची घटना आपल्याला आपल्या जिनिंग मध्ये काम करीत असलेल्या अर्जुन पवार यांने कळविली व त्यानंतर मी आम्ही पाहणी केली असता चोरी झाल्याचे दिसून आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस कर्मचारी कालीचरण बिर्‍हाडे करीत आहेत.


कॉपी करू नका.