पोलिस चौकीसमोर कार दुचाकीला धडकली : दुचाकीस्वार जखमी
Car collides with two-wheeler in front of police post : Two-wheeler injured जळगाव : शहरातील आठवडे बाजारातील पोलिस चौकासमोर कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातप्रकरणी तब्बल अडीच महिन्यानंतर शुक्रवारी कारचालकाविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
कारचालकाविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील गटाणी चाळ येथे विलास रमेश सपकाळे (40) हे वास्तव्यास आहे. 24 डिसेंबर 2022 रोजी ते जळगाव शहरातील आठवडे बाजारात पोलिस चौकीसमोरुन दुचाकीने जात असतांना (एम.एच.43 ए.एल.5944) या क्रमाकांच्या कारने विलास सपकाळे यांच्या दुचाकीला धडक दिल्याने सपकाळे हे खाली पडून त्याच्या कंबरेला दुखापत झाली. अपघातानंतर कारचालक निघून गेला होता. या अपघातानंतर उपचार घेतल्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर विलास सपकाळे यांनी गुरुवार, 9 मार्च रोजी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्यावरनू वरील कारवरील चालक राहुल शेवाळे (कासमवाडी) विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल मनोज पवार करीत आहेत.

