यावल पोलिस ठाण्यात अरुण धनवडेंनी स्वीकारला पदभार

यावल : यावल पोलिस स्टेशनचे निरीक्षक रवीकांत सोनवणे यांची जळगाव तालुका पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बदली केल्यानंतर त्यांच्या रीक्त जागी अरुण धनवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण धनवडे यांनी नुकतीच पोलिस निरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली आहे. मुंबई येथील क्राईम ब्रँच शाखेतील त्यांच्या अनुभवाचा यावल शहरवासीयांना मोठा फायदा होणार आहे. अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेले धाडसत्र तसेच अवैध वाहतुकीविरुद्ध त्यांनी मोहिम राबवल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासनाने कारवाईत सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


