जळगावात महाविकास आघाडीला धक्का ! : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी संजय पवार

ऐनवेळीच्या बंडखोरीच्या खेळीने राजकीय वर्तुळात खळबळ : व्हा.चेअरमनपदी अमोल पाटील : माजी मंत्री खडसेंना धक्का


Shock to Mahavikas Aghadi in Jalgaon : Sanjay Pawar as Chairman of Jalgaon District Central Cooperative Bank जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांची निवड निश्चित केली होती मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी बंडखोरी करीत अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याने निवडीसाठी गुप्त मतदान घेण्यात आले व त्यात संजय पवार (धरणगाव) यांना 21 पैकी 11 तर अ‍ॅड.रवींद्र पाटील यांना दहा मते मिळाल्याने पवार यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अमोल चिमणराव पाटील यांची निवड करण्यात आली. दरम्यान, जिल्हा बँकेत अचानक राजकीय चित्र बदलल्याने माजी मंत्री खडसेंसाठी ही बाब धक्कादायक मानली जात आहे.

संजय पवारांची बंडखोरी की धक्कातंत्र ?
जिल्हा बँकेत महाविकास आघाडी व शिवसेना शिंदे गट यांची संयुक्त सत्ता असून महाविकास आघाडीकडे अध्यक्षपद तर शिंदें गटाकडे उपाध्यक्ष पद असेल, असे ठरले होते. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील यांचे महाविकास आघाडीने नाव निश्चित केले असलेतरी शनिवारी मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी बंडखोरी करीत खळबळ उडवून दिले. दोन अर्जांमुळे गुप्त मतदान घेण्यात आले व संजय पवार यांना 21 पैकी 11 मते मिळाल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली तर अ‍ॅड.रवींद्र पाटील यांना केवळ दहा मते मिळाली. दरम्यान, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !