सोलापूर विभागात रेल्वेचा ब्लॉक : 10 रेल्वेगाड्या रद्द, 12 गाड्यांचे मार्ग बदलले


Railway block in Solapur division: 10 trains cancelled, 12 trains route changed भुसावळ : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागातील बेलापूर, चितळी, पुणतांबा दुहेरी लाईन यार्डच्या रीमोल्डिंग कामांमुळे बुधवार, 22 व गुरुवार, 23 मार्चला ब्लॉक घेण्यात आल्याने या मार्गावरील 10 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर 12 गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून अन्य चार गाड्यांच्या वेळादेखील बदलल्या आहेत. दरम्यान, सोलापूर विभागात घेण्यात येणार्‍या ब्लॉकचा फटका प्रवासी रेल्वे गाड्यांना बसणार असल्याने प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन सणात गाड्या रद्द केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या गाड्या झाल्या रद्द
गाडी क्रमांक 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 21 व 22 दोन दिवस गाडी रद्द करण्यात आली असून गाडी क्रमांक 17629 पुणे-नांदेड एक्सप्रेस 22 व 23 मार्चला सुटणारी गाडी रद्द केली आहे. गाडी 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी 21 व 22 या दिवशी कोल्हापूरहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली तर 11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस 22 व 23 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. 11041 दादर-साई नगर शिर्डी एक्स्प्रेस 21 व 22 मार्चला तर 11042 साईनगर शिर्डी-दादर ही 22 व 23 मार्च रोजी गोंदियाहून सुटणारी दादर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. 12114 नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 21 मार्च रोजी नागपूरहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. 12113 पुणे-नागपूर एक्स्प्रेस ही गाडी 22 मार्च रोजी पुण्याहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली असून 12136 नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 22 मार्च रोजी नागपूरहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. 12135 पुणे-नागपूर एक्स्प्रेस ही गाडी 23 मार्चला पुण्यातून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

या गाड्यांच्या मार्गात बदल
बंग्लोर-नवी दिल्ली (12627) एक्स्प्रेस ही गाडी 22 व 23 मार्च रोजी बेंगळुरूहून सुटणारी गाडी ही पुणे-लोणावळा-वसई रोड-वडोदरा-रतलाम-संत हिरडाराम नगर या मार्गाने वळवण्यात आली तर 22685 यशवंतपूर-चंदीगड ही गाडी 22 मार्चला यशवंतपूरहून सुटणारी गाडी पुणे-लोणावळा-कल्याण-मनमाड या मार्गाने वळवण्यात आली आहे. यशवंतपूर-निजामुद्दीन ही गाडी 21 मार्च रोजी यशवंतपूरहून सुटणारी गाडी पुणे-लोणावळा-कल्याण-मनमाड या मार्गाने वळवण्यात आली आहे. पुणे-हटिया ही गाडी पुण्याहून 22 मार्चला सुटणारी गाडी वाडी-सिकंदराबाद-बल्हारशाह-नागपूर या मार्गाने वळवण्यात आली आहे. पुणे-गोरखपूर ही गाडी 22 मार्चला पुण्याहून सुटणारी गाडी – लोणावळा-पनवेल-कल्याण-मनमाड या मार्गाने वळवण्यात आली आहे. पुणे-हावडा ही गाडी 22 पुण्याहून सुटणारी गाडी-वाडी-सिकंदराबाद-बल्हारशाह-नागपूर या मार्गाने वळवण्यात आली आहे. हावडा-पुणे ही गाडी 20 व 21 मार्चला हावडाहून सुटणारी गाडी नागपूर-बल्हारशाह-सिकंदराबाद-वाडी-दौंड या मार्गाने धावणार आहे. अहमदाबाद-यशवंतपूर ही गाडी 21 मार्चला अहमदाबादहून सुटणारी गाडी सुरत-वासी रोड-लोणावळा-कल्याण-पुणे या मार्गाने वळवण्यात आली आहे. हजरत निजामुद्दीन-वास्को ही गाडी 21 व 22 मार्चला हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी गाडी संत- हिरडाराम नगर-रतलाम-वडोदरा-वसई रोड-पनवेल-लोणावळा-पुणे या मार्गाने वळवण्यात आली आहे. जम्मू तवी- पुणे झेलम एक्स्प्रेस ही गाडी 21 व 22 मार्चला जम्मूहून सुटणारी गाडी संत हिरडाराम नगर-रतलाम-वडोदरा-वसई रोड-पनवेल-लोणावळा या मार्गाने वळवण्यात आली तर नवी दिल्ली-बंगलोर एक्स्प्रेस ही गाडी 21 व 22 मार्चला नवी दिल्लीहून सुटणारी गाडी संत-हिरडाराम नगर-रतलाम-वडोदरा-वसई रोड-पनवेल-लोणावळा या मार्गाने धावणार आहे. दानापूर-पुणे ही गाडी 22 मार्चला दानापूरहून सुटणारी गाडी लोणावळा-पनवेल-कल्याण-मनमाड या मार्गाने धावणार आहे.

या गाड्यांच्या वेळेत बदल
ट्रेन क्रमांक 02131 पुणे-जबलपूर ही गाडी 13 व 20 या दिवशी पुण्याहून दुपारी 3.25 वाजता सुटेल. पुणे-लखनौ ही गाडी 14 व 21 मार्चला पुण्याहून दुपारी 3.25 वाजता सुटेल. पुणे-हटिया ही गाडी 12, 15 व 19 मार्चला पुण्याहून दुपारी 3.25 वाजता सुटेल. पुणे-गोरखपूर ही गाडी 11 व 18 मार्चला पुण्याहून दुपारी 3,.25 वाजता सुटेल. प्रवाशांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !