खिदमते मिल्लत फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट कार्य करणार्या व्यक्तींचा सन्मान

फैजपूर : शहरातील खिदमते मिल्लत फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या व्यक्तींचा जीवन गौरव सोहळा खादीमे मिल्लत पुरस्काराने गुरुवारी सन्मान रकण्यात आला. शहरातील महात्मा गांधी बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी तर उद्घाटक म्हणून अब्दुल करीम सालार उपस्थित होते.
यांवी व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर मौलाना शरीफ अहेमद, डॉ.अब्दुल जलील, मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शोएब मोहंमद खान, फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांची प्रमुख अतिथी उपस्थिती होती. प्रास्ताविक खिदमते मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नजर मोहंमद आरिफ यांनी केले. यावेळी धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, राजकीय, पत्रकारीता, साहित्य, शायरी, जीवनगौरव या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या व्यक्तींना खादीमे मिल्लत पुरस्कारमान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. त्यात खादिमे मिल्लत पुरस्कार धार्मिक श्रेत्र–कारी बदिऊज्ज़मा, मुफ्ती अरशद अली शौकत अली, हाफीज़ हमिदउद्दीन फलाही, शैक्षणिक क्षेत्र- आर.क्यु शेख, ईस्माइल खां तुकडु खां तडवी, सामाजिक क्षेत्र- शेख इकबाल हुसैन शेख हसन, अमिनुद्दीन शेख युसुफ, आरोग्य क्षेत्र- डॉ.मुदस्सर नजर शेख अ.नबी, डॉ.तन्वीर अहमद शेख निसार, डॉ.इमरान अखतर शेख अ.रऊफ, राजकीय क्षेत्र-माजी उपनगराध्यक्ष शहेनाज बी.शेख युसूफ, नगरसेविका नफीसा बी .शेख ईरफान, साहित्य क्षेत्र- सलीम खान ईस्माइल खान, वसीम अकील शाह, शायरी क्षेत्र- मरहुम रफीक आदिल, रईस फैजपुरी, पत्रकारीता- समीर तडवी, शेख कामील अ.रेहमान, जीवन गौरव पुरस्कार- मरहुम आर.एम.शेख, अब्दुल करीम सालार, अब्दुल्ला शेख रसूल, हयात खान वाहेद खान यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी माजी नगरसेवक शेख जफर, काँग्रेस गटनेता कलीम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रीयाज, युवक काँग्रेस शहराध्यक्ष शेख वसीम जनाब, सैय्यद असगर, इरफान शेख, जावीद जनाब, जलील हाजी अब्दुल सत्तार, आसीफ मॅक्निकल, मुख्याध्यापक अब्दुल रहीम सर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी
फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नजर मोहंमद आरीफ, उपाध्यक्ष सैय्यद फारुक सैय्यद फकिरा, सचिव इमरान खान, सहसचिव कामील खान, खजिनदार शेख शाफिक शेख बाबू, सल्लागार शेख अखतर शेख युसूफ, सदस्य नाजीम शेख गफ्फार यांनी परीश्रम घेतले.


