जळगावात भाजपा महिला पदाधिकार्‍याची धूम स्टाईल चैन लांबवली


In Jalgaon, the dhoom style chain of BJP women office-bearers has been extended जळगाव  : शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना पाटील या दुचाकीवरून घराकडे जात असताना धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची चैन लांबवली. ही घटना शुक्रवारी रात्री 9 वाजता घडली. या प्रकरण रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
वंदना पाटील या शुक्रवारी रात्री घराकडे दुचाकीवरून निघाल्यानंतर म्युन्सीपल कॉलनीजवळील ज्येष्ठ नागरीक संघाच्या कार्यालयाजवळ लाल-काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील चैन ओढली मात्र यावेळी झालेल्या झटपाटीत चैनमधील सोन्याचे पेंडल हे खाली पडले व 10 ग्रॅमची चैन घेवून चोरटे पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर वंदना पाटील यांनी तात्काळ रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक रोहिदास गमाले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !