वरणगाव पाणीपुरवठा योजनेवर बसवलेली स्थगिती उठवावी


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगराध्यक्ष सुनील काळेंची मागणी

भुसावळ : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस हे भुसावळ रेल्वे स्थानकावर दुरांतो या एक्सप्रेसने शुक्रवारी पहाटे पाच वाजता आल्यानंतर आमदार संजय सावकारे, माजी आमदार हरीभाऊ जावळे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, वरणगाव नगरीचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह समर्थकांनी स्वागत केले. याप्रसंगी काळे यांनी वरणगाव पाणीपुरवठा योजनेवर बसवलेली स्थगिती उठवण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केली.

मंजूर पाणीपुरवठा योजनेला सरकारकडून स्थगिती
प्रसंगी काळे यांनी माजी मंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा करीत भाजपा सरकारच्या काळात 13 सप्टेंबर 2019 रोजी वरणगाव शहराला 25 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती तर सर्व मंजुर्‍या घेउन योजनेचे टेंडर सुद्धा काढण्यात आले मात्र राज्य सरकारने जनहिताच्या अत्यावश्यक मंजूर पाणीपूवरठा योजनेला स्थगिती दिली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून सरकारकडून या योजनेवरील स्थगिती उठवावी, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी वरणगावकारांवर अन्याय होऊ देणार नाही, योजनेवरील स्थगिती निश्‍चित उठवू, असे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले. प्रसंगी फडवणीस यांनी वरणगाव पालिकेतील सुरू असलेल्या कामांबाबत आढावा घेतला. प्रसंगी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अजय पाटील, सुनील माळी, लखन माळी, तेजस जैन, आकाश निमकर, कुंदन माळी, हितेश चौधरी, सोहेल कुरेशी, किरण धुंदे आदी कार्यकर्ते स्वागतासाठी उपस्थित होते.


कॉपी करू नका.