भुसावळातील तरुण अभियंता महामार्गावर अपघातात ठार

रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक : महामार्गावर अपघात वाढले
भुसावळ : शहरातील हनुमान नगरातील रहिवासी व राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामावर अभियंता म्हणून नेमणुकीस असलेल्या सागर प्रकाश बर्हाटे (22) या तरुणाचा भरधाव बोलेरोने धडक दिल्याने मृत्यूझाल्याची घटना महामार्गावरील मकरा फटाके एजन्सीजवळ शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. सागर बर्हाटे हा तरुण रस्ता ओलांडत असताना त्याला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आयुष प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ठेका मिळालेला आहे. त्यानुसार दीड वर्षांपासून महामार्गाचे काम सुरू आहे. या कंपनीत इंजिनिअर म्हणून सागर बर्हाटे चार महिन्यांपूर्वी रुजू झाला होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सागर कामावर आला व महामार्गावरील मकरा एजन्सीजवळ काम सुरू असताना रस्ता ओलांडताना भुसावळकडून जळगावकडे येणार्या विना नंबरच्या बोलोरोने धडक दिल्याने सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धडक दिल्यानंतर महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी घटनास्थळावरून पसार झाली.जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयत सागरच्या पश्चात आई मीनाक्षी, वडील प्रकाश रामा बर्हाटे, भाऊ पुष्पक असा परीवार आहे.


