मानवाधिकार सुरक्षा संस्थेच्या भुसावळ शहर स्वयंसेवकपदी चेतन जैन


Chetan Jain, Bhusawal City Volunteer of Human Rights Security Organization भुसावळ :  मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनायझेशनच्या भुसावळ शहर स्वयंसेवकपदी भुसावळातील रहिवासी व भारतीय शाकाहार संघाचे जिल्हाध्यक्ष चेतन जैन यांची निवड करण्यात आली. मानवाधिकार संरक्षण ऑर्गनायझेशन ही शासनाकडून मिळणार्‍या सुविधांची समाजाला जाणीव करून देऊन त्यांना त्या मिळविण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करून शासनाला सहकार्य करते. यासोबतच समाजाला न्याय, नैतिक आणि घटनात्मक जबाबदार्‍यांची जाणीव करून देऊन समाजसेवेची कामदेखील संस्थेतर्फे केले जाते.देशातील प्रत्येक जिल्ह्यात मानवी हक्क संरक्षण न्यायालये स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. जैन यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !