Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : एकाच कुटूंबातील सहा जण ठार
Fatal accident on Samriddhi Highway: Six people from the same family were killed बुलडाणा : मेहकरजवळ कारला भीषण अपघात झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जण ठार, तर 7 जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार ही कार औरंगाबादहून शेगावला जात होती. गाडीत एकूण 13 प्रवासी होते. मेहकरजवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर गाडीचा अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान घडला. भरधाव वेगातील इर्टिगा गाडी (एम.एच.20 -8962 आहे.) ही रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमध्ये घुसली व तीन ते चार पलट्या मारून दुसर्या बाजूच्या रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये चार जण घटनास्थळीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावले.
यांचा झाला मृत्यू
मृतांमध्ये हौसाबाई भरत बर्वे (60), श्रद्धा सुरेश बर्वे (28), किरण राजेन्द्र बोरुडे (35), भाग्यश्री किरन बोरुडे (वय 28), प्रमिला राजेन्द्र बोरुडे (58), जानवी सुरेश बरवे (12 वर्ष) यांचा यांचा समावेश आहे. तर अपघातग्रस्त कारचे मालक हे सुरेश बर्वे हे असल्याची माहिती आहे. ते एन-11 द्वारकानगरचे रहिवासी असून एमएसईबीचे कर्मचारी आहे. ते त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी समृद्धी महामार्गावरून जात असताना हा अपघात झाला.

