भुसावळात दुचाकी चोरींचे सत्र कायम : पुन्हा दुचाकी लांबवली


Session of two-wheeler theft continues in Bhusawal : Two-wheeler postponed again भुसावळ : शहरात दुचाकी चोरींचे सत्र कायम असून पुन्हा हनुमान नगर भागातून 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बाजारपेठ पोलिसात गुन्हा
तक्रारदार प्रकाश काशीनाथ बाविस्कर (35, शिवकॉलनी, फैजपूर, ह.मु.कल्याण) यांनी दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए.टी.1512) ही विवेकानंद नगरातील हनुमान मंदिराजवळ लावली असता चोरट्यांनी संधी साधून ती लांबवली. 9 रोजी दुपारी 1 ते 3 दरम्यान ही घटना घडली. तपास नाईक उमाकांत पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !