चोरीच्या तीन मोबाईलसह चोरटा भुसावळ शहर पोलिसांच्या जाळ्यात
Thief with three stolen mobile phones in Bhusawal city police net भुसावळ : दुचाकीच्या डिक्कीतून एकाने 38 हजार 500 रुपये किंमतीचे तीन मोबाईल लांबवल्याची घटना फिल्टर हाऊसजवळ घडली होती. या प्रकरणी एकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीताला अटक करण्यात आली. विकास गोरखा (कवाडेनगर, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
38 हजारांचे तीन मोबाईल जप्त
सुरज शशीकांत नरवाडे (20, पांडुरंगनाथ नगर, गोकुळ नगर, पूजा कॉम्प्लेक्सजवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयित विकास गोरखा (कवाडेनगर, भुसावळ) याने त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून 38 हजार 500 रुपये किंमतीचे तीन मोबाईल दुचाकीच्या डिक्कीचे लॉक लांबवले. ही घटना रेल्वे फिल्टर हाऊसजवळ मंगळवार, 7 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. तपास नाईक जाकीर मन्सुरी करीत आहेत.

