न्हावीतील विवाहितेचा छळ : चौघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा
Harassment of married woman in Nhawi : A case has been registered against four in Yaval police यावल : तालुक्यातील न्हावी येथील माहेर असलेल्या 23 वर्षीय विवाहितेला पतीसह चौघांनी शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच तिचा छळ केला. या प्रकरणी चौघांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा
न्हावी येथील फरजाना बी शेख अशपाक (23) या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह 2019 मध्ये शेख अशपाक शेख मुस्ताक (खिर्णीपुरा, यावल) यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पती शेख अशपाक शेख मुस्ताक, तौफिक शेख मुस्ताक, समीर शेख मुस्ताक व शमीम मुस्ताक शेख या चौघांनी तिला नेहमी कामधंदा करण्याच्या संदर्भात टोचून बोलत शिवीगाळ करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.

