विद्यार्थ्यांकडून एस.टी.वाहकाला बसमध्ये मारहाण


यावल- यावल एस.टी.आगारातील वाहकाने विद्यार्थ्यांना बसमध्ये मागे सरकण्यास सांगितल्याचा राग आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनी वाहकासच मारहाण केल्याची घटना 3 रोजी सकाळी घडली. 3 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास यावल आगारातून सावखेडासीमकडे बस (एम.एच.20- 9037) ही बस घेवून चालक नितीन साहेबराव बारी गेल्यानंतर परतीच्या प्रवासात दहिगाव-विरावली रस्त्याच्या दरम्यान काही विद्यार्थी रस्त्यावर उभे होते. या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतल्यानंतर बसमधील वाहक मेहमूद हमीद तडवी यांनी विद्यार्थ्यांना मागे सरका म्हटल्याचा राग आल्याने विद्यार्थ्यांनी वाहकास बेदम मारहाण केली. या संदर्भात वाहक मेहमुद हमीद तडवी (41) यांच्या फिर्यादीनुसार दहिगावच्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.