वीज चोरी करणार्या बामणोद गावातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
A case has been registered against three people of Bamanod village who stole electricity यावल : तालुक्यातील बामणोद येथे तीन जणांना वीज चोरी करताना राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पथकाने पकडले. संबंधितांना दंड केल्यानंतर त्यांनी दंड न भरल्याने तिघांविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात अखेर गुन्हा दाखल
बामणोद येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता देवेंद्र सुधाकर भंगाळे यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी बामणोद गावात रमेश मिठाराम सोनवणे, चिंतामण माधव सोनवणे व विलास सुपडू सोनवणे या तीन जणांकडे वीज चोरी करतांना कारवाई केली व या तिघांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आकारून दंड भरण्याची सूचना केल्या मात्र या तिघांनी दंड अदा केला नाही. या प्रकरणी देवेंद्र भंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
