पत्नीच्या मृत्यूनंतर बोदवडला विहिरीत उडी घेत तरुणाची आत्महत्या


After the death of his wife, a young man committed suicide by jumping into a Bodwadla well बोदवड : शहरातील रहदारीच्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत युवकाने उडी घेत आत्महत्या केली. निलेश सुभाष माळी (36) असे मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

विहिरीत उडी घेत आत्महत्या
गत वर्षभरापूवी निलेश यांच्या पत्नीने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याने निलेशविरोधात पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता शिवाय त्यास अटकदेखील करण्यात आली होती. या गुन्ह्यात जामीन सुटल्यानंतर सतत पत्नीच्या मृत्यूचे शल्य त्याच्या मनाला बोचत असल्याने निलेश माळी याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर चौकातील व्यावसायीकांनी दुकाने बंद ठेवली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !