अट्टल चोरटा जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


गोंडगावातील चोरी प्रकरणी केली अटक

जळगाव : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील विनायक काशीनाथ कोतकर यांच्या राजेश मेडीकल व जनरल स्टोअर्स दुकानात 20 जुलै 2019 रोजी मध्यरात्री 22 हजारांची चोरी झाली होती. भडगाव पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल होता. या अनुषंगाने जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीनुसार मिथुनसिंग मायासिंग बावरी (28, रा.कजगाव, ता.भडगाव) यास अटक केली आहे. आरोपीने चोरीची कबुली देत सात हजारांचा मुद्देमाल काढून दिला असून त्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकानात चोरीसह घरफोड्या केल्याची दाट शक्यता आहे.

यांनी केली कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाटील, अनिल इंगळे, संतोष मायकल, रमेश चौधरी, नरेंद्र वारुळे, अशोक पाटील, किरण चौधरी यांनी ही कारवाई केली. आरोपीला भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


कॉपी करू नका.