भुसावळातील आतीश खरात चाकूसह बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
Atish Kharat in Bhusawal in police net with knife in market
चाकू बाळगणारा संशयीत पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : शहरातील पंधरा बंगला परीसरातील गार्ड लाईन भागातून आतीश रवींद्र खरात (25, समता नगर, भुसावळ) यास धारदार चाकू बाळगताना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री 12 वाजेनंतर करण्यात आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गस्तीदरम्यान संशयीतावर कारवाई
बाजारपेठ पोलीस गस्तीवर असताना संशयित आतीश खरात याच्याकडे चाकू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास बुधवारी रात्री गार्डलाईन भागात पकडण्यात आल्यानंतर त्याच्या ताब्यातून चाकू जप्त करण्यात आला व आर्म अॅक्ट अन्वये शहर कॉन्स्टेबल प्रशांत सोनार यांच्या फिर्यादीनुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आतीश विरोधात बाजारपेठ पोलिसात यापूर्वीदेखील गुन्हा दाखल असून त्यास न्यायालयाने 18 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास हवालदार रवींद्र सपकाळे करीत आहेत.