यावलच्या बुरूज चौकात हाणामारी : तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल


Clash in Yaval’s Buruj Chowk: A case has been registered against three people यावल : शहरातील बुरूज चौकात तीन जणांनी आपसात मारामारी करीत आरडा-ओरड करीत शिविगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याने या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
यावल शहरातुन मार्गस्त होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर बुरूज चौक असून तेथे अरुण कमल तायडे, दीपक भगवान अडकमोल व नितीन भगवान अडकमोल (तिघे रा.बोरावल गेट, यावल) या तिघांनी आपसात मारामारी करीत एकमेकांना शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध यावल पोलिसात पोलीस कर्मचारी अब्दुल गनी शकील बेग मिर्झा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !