तिसर्‍या दिवशीही संप कायम : भुसावळात 17 संघटनांचा संपात सहभाग


Strike continues on third day : 17 organizations participate in strike in Bhusawal भुसावळ : तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मागणीसाठी संप पुकारला असून तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे शाळा-महाविद्यालयांसह शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरला असून आरोग्य सेवा कोलमडल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. गुरुवार, 16 रोजी कर्मचार्‍यांनी आंदोलन अधिक तीव्रतेने सुरू केले असून संपात 17 कर्मचारी संघटनांनी सहभाग घेतला आहे. पंचायत समिती कार्यालयात संपकरी कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलन केले. एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणेने पंचायत समिती परीरसर दणाणला होता.

पोलीस कर्मचार्‍यास श्रद्धांजली
भुसावळ : शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सागर दिलीप देहाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ड्युटीवर असताना दुःखद निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, आंदोलनात सहभागी झालेले माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे व सर्व कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने शहर पोलीस स्टेशन येथे एकत्र येत देहाडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.

जुनी पेन्श  योजनेची मागणी रास्त : उमेश नेमाडे
कर्मचारीदेखील मानव आहेत. त्यांना निवृत्तीनंतर उर्वरीत आयुष्य चांगले जाण्यासाठी जुनी पेन्शन आवश्यक आहे. जुनी पेन्शन योजनेची मागणी रास्त असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या लढ्यात सोबत असल्याचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी कर्मचार्‍यांना सांगितले. दरम्यान, जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनात 17 कर्मचारी संघटनांनी सहभाग नोंदवला असून यात मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना, कृषी सहाय्यक संघटना, तलाठी संघटना, शिक्षक भारती, शिक्षक परीषद, उच्च माध्यमिक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, बहुजन शिक्षक संघटना, शिक्षक समन्वय समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक भारती संघटना, अखिल भारतीय महिला शिक्षक संघटना, कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, टीडीएफ संघटना, पाटबंधारे विभाग संघटना आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बोदवड मध्ये कार्यालयात शुकशुकाट
बोदवड :
सरकारी कर्मचार्‍यांच्या राज्यव्यापारी संपामुळे नागरीकांचे हाल होत असून शासकीय कार्यालयांमधील शुकशुकाटमुळे नागरीकांची कामे खोळंबली आहेत तर शाळांमध्ये विद्यार्थी संख्या रोडावल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बोदवड तहसीलसह ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती तसेच सर्व शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !