40 वर्षीय महिलेशी अश्लील वर्तन करीत विनयभंग : एकाविरोधात गुन्हा


Molesting a 40-year-old woman with lewd behavior : Offense against one जामनेर : रस्त्याने पायी नातेवाईकांकडे जाणार्‍या 40 वर्षीय महिलेचा रस्ता अडवत एकाने अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. ही घटना जामनेर तालुक्यातील कुंभारी खुर्द गावात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रस्ता अडवत केला विनयभंग
महिला शेती करून आपला उदरनिर्वाह करते. गुरूवार, 16 मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महिला ही आपल्या माम सासूकडे भेटण्यासाठी पायी निघाली असताना संशयित विनोद देवचंद राठोड (42, नारडा नगर, जामनेर) याने महिलेचा रस्ता अडवत तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !