भादलीच्या तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण


Bhadli youth beaten for minor reason जळगाव : माझ्या टपरीजवळ का बसला ? या किरकोळ कारणावरून वाद झाल्याने भादली खुर्द गावातील 32 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ कारणावरून मारहाण
सतीश सुखदेव सोनवणे (32, भादली खुर्द, जि.जळगाव) या तरुणाच्या तक्रारीनुसार, गुरुवार, 16 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता तो गावातील शाळेजवळ असलेल्या एका टपरीजवळ बसला असल्याचे कारणावरून संशयित टपरीधारक समाधान एकनाथ कोळी (भादली खुर्द) याने टपरीवर का बसला याचा जाब विचारत तरुणाला अश्लील शिवीगाळ केली तसेच तरुणाच्या आई-वडील व पत्नीला शिवीगाळ करीत तरुणास लाकडे दांडक्याने डोक्यावर व पायावर मारहाण केली. या प्रकरणी गुरुवारी रात्री तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी समाधान एकनाथ कोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक किरण आगोणे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !