धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा दुदैवी मृत्यू : पाचोरा स्थानकाजवळील घटना
A migrant youth died after falling from the train between Pachora-Galan पाचोरा : धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमधून पडल्याने परप्रांतीय 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान गुरुवार, 16 मार्च रोजी दुपारी चार वाजता घडली. पाचोरा लोहमार्ग दुरक्षेत्र पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. इसरार इसहाक (22, डिवाह, जि.बहराईच (उत्तर प्रदेश) असे मयत युवकाचे नाव आहे.
तोल जावून पडल्याने मृत्यू
इसरार इसका हा तरुण लखनऊहून मुंबईत कामासाठी बुधवारी पुष्पक एक्स्प्रेसने निघाला होता मात्र गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पाचोरा स्थानक क्रॉस केल्यानंतर रेल्वे कि.मी.खांबा क्रं. 363/19/20 नजीक इसरारचा तोल गेल्याने तो खाली पडताच त्याचा मृत्यू ओढवला. घटनेची माहिती रेल्वेचे गार्ड यांनी पाचोरा रेल्वे स्थानकावर कळविल्यानंतर लोहमार्ग दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे एएसआय किशोर वाघ हे रुग्णवाहिकेसह हजर झाले. रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलीस दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ुढील तपास चाळीसगावचे सहा.निरीक्षक किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय किशोर वाघ करीत आहेत.