MP Sanjay Raut हे सरकार कोसळणारच ! ‘ते’ आमदार खर्‍या शिवसेनेत परततील मात्र आम्ही एकनाथ शिंदेना घेणार नाही : खासदार संजय राऊत यांचे मोठे विधान


This government will collapse! ‘Those’ MLAs will return to real Shiv Sena but we will not take Eknath Shindena: MP Sanjay Raut’s big statement नाशिक : एखाद्याला गाडायचे ठरवले तर मी गाडतोच. इलेक्शन कमिशनला विचारून बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नाही. जनतेने बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखपद दिले असून इलेक्शन कमिशनचा बाप जरी आला तरी शिवसेना आणि धनुष्यबाण काढू शकणार नाही, असा सज्जड इशारा मालेगावात खासदार संजय राऊत यांनी दिला. पुढे ते म्हणाले की, भाजपासोबत गेलेले आमदार लवकरच शिवसेनेत परततील कारण आम्हीच खरी शिवसेना आहोत तर सगळे परतले तरी एकनाथ शिंदे येणार कारण त्यांना आम्ही घेणारही नाही, असे टोला खासदार संजय राऊत यांनी येथे लगावला.

मालेगावात होणार ठाकरेंची सभा
उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेडमध्ये सभा झाल्यानंतर इतर ठिकाणी देखील सभा होणार आहेत. मालेगावमध्ये रविवार, 26 तारखेला सभा होत असून उत्तर महाराष्ट्राची ही सभा होणार असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. सध्याचे राजकारण लोकांना चांगलं कळालं आहे. लोक यांना वैतागले आहेत. सरकार ज्याप्रमाणे काम करत आहे ते पाहता लवकरच हे सरकार पडणार असून शिवसेनेतून बाहेर पडलेला गट पुन्हा शिवसेनेत येणार आहे मात्र एकनाथ शिंदे वगळता सर्व शिवसेनेत येतील. आम्ही एकनाथ शिंदे यांना घेणारही नाही, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

होय मी टोकाचेच बोलतो
संजय राऊत म्हणाले, लोक म्हणतात संजय राऊत टोकाचे बोलतात. होय मी टोकाचे बोलतो आणि बोलणारच. कारण मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी तुरुंगात जावून आलो. मी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, माझ्या पक्षासाठी जेलमध्ये गेलो. या पन्नास गद्दारासारखे गुडघे टेकले असते तर मी तुरुंगात गेलो नसतो. तुरुंगात अतोनात मी त्रास सहन केला. तुरुंगात अतोनात मी त्रास सहन केला.तरीही मी शिवसेना सोडली नाही, सोडणार नाही. समोर बसलेले शिवसैनिक हीच खरी शिवसेना आहे. त्यांच्यासाठी मला लढायचे आहे. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे हा खूप मोठा इतिहास आहे. हा इतिहास कुणाला चोरता येणार नाही. मी एवढेच सांगेल की, यापुढचा संघर्ष कठिण, तीव्र असेल पण अंतिम विजय आपलाच आहे. या महाराष्ट्रात आणि दिल्लीत आपलेच राज्य असेल तेव्हा बघू की, ईडी आणि सीबीआय काय करते ते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !