भुसावळ पालिकेतील वसुली कर्मचारी विनय पगारेंचे निलंबन

भुसावळ : पालिकेच्या वसुली विभागातील कर्मचारी विनय पगारे यांना मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी निलंबित केल्याने पालिकेतील कर्मचार्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. वसुली विभागाचे कर्मचारी पगारे हे नगरपालिकेत नोकरीला असतानाही ते शासनमान्य रास्त भाव दुकान चालवत असल्याची तक्रार येथील दिनेश उपाध्याय यांनी संबंधीत अधिकार्यांकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी चौकशी अहवाल पाठवला होता. या चौकशी अहवालावरून जिल्हाधिकार्यांनी निलंबनाचा आदेश दिल्याने आदेशाची अंमलबजावणी केल्याचचे मुख्याधिकारी करूना डहाळे म्हणाल्या.
उच्च न्यायालयात दाद मागणार -पगारे
स्वस्त धान्य दुकान हे आपल्या भावाच्या नावावर असून चुकीच्या पद्धत्तीने कारवाई करण्यात आल्याने या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे विनय पगारे म्हणाले. दुकानाचा व आपला संबंध नाही शिवाय दुकान निलंबीत असल्याचेही ते म्हणाले.


