ऊबदार कपड्यांमुळे वंचितांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य


सखी श्रावणी संस्थेतर्फे मांडवेदिगर वस्तीवर ऊबदार कपड्यांचे वाटप

भुसावळ : तालुक्यातील मांडवादिगर येथील आदिवासी भिल्ल वस्तीत सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे नुकतेच ब्लँकेटस, ऊबदार कपडे, चपला, बुट वाटप करण्यात आले तसेच अन्नदान करण्यात आले. महंत शिवानंदभारती महाराज यांच्या भोलेशंकर भारती या आश्रमात हा कार्यक्रम झाला. महंत शिवानंद भारती महाराज व भारत स्वाभिमान पतंजली जिल्हा प्रमुख भंवरलालजी जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांना शिक्षण हे अतिशय महत्वाचे आहे, साक्षर झाल्या शिवाय आपण प्रगती करू शकणार नाही, शिक्षणासोबत आपण स्वच्छतेची सवय अंगीकारणे गरजेचे आहे. मुलांना शाळेत पाठवणे, त्यांना शिक्षण देणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य असल्याचे संस्थेच्या संस्थापिका राजश्री नेवे म्हणाल्या.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व सभासद माया चौधरी, वंदना झांबरे, अनुराधा टाक, पुष्पा अग्रवाल, दीपा पाटील, रेखा जोशी, मंदाकिनी केदारे, स्मिता माहुरकर, महानंदा पाटील, संगिता लुल्ला, तेजस्विनी प्रजापती उपस्थित होत्या. गणेश राठोड व विघ्नहर्ता पब्लिकेशनचे रवींद्र निमाणी यांचे सहकार्य लाभले.


कॉपी करू नका.