ज्वलनशील पदार्थामुळे डाऊन कृषीनगरच्या बोगीला आग : चाळीसगावजवळील प्रकार

बर्निंग ट्रेन होण्यापूर्वीच प्रवाशांची सतर्कता : तासाभराच्या विलंबाने गाडी रवाना : संशयीत प्रवाशाचा कसून शोध


Bogi fire at Down Krishinagar due to inflammable material : Type near Chalisgaonचाळीसगाव  : डाऊन कुशीनगर एक्सप्रेसच्या जनरल डब्यातील प्रवाशांच्या सामान ठेवण्याच्या बर्थला न्यायडोंगरी- पिंपरखेड रेल्वेस्थानका दरम्यान शनिवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये थरकाप उडाला तर आग लागल्यानंतर प्रवाशांनी प्रचंड आरडा-ओरड केली तर चाळीसगावजवळ चैन पुलिंग करून गाडी थांबवण्यात आल्यानंतर संशयीत प्रवासी मात्र निसटला तर एक प्रवासी बॅगेला लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नात जखमी झाला.

स्फोटक पदार्थांचा स्फोट झाल्याचा संशय
डाऊन कुशीनगर एक्सप्रेस मधे इंजीनापासुन तिसर्‍या कोचमधे नायडोंगरी स्थानकाजवळ एका प्रवाशाच्या बॅगमधील स्फोटक वस्तूचा अचानकपणे स्फोट झाल्याने बॅगेसह सीट जळू लागताच दोन प्रवाशांच्या बॅॅगाही जळू लागल्या. यात अजय अशोक मगरे (23) या प्रवाशाने बॅगेला लागलेली आग पायाने विझवण्याचा प्रयत्न केल्याने त्याचा पाय भाजला गेला. पाचोरा येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले तर त्याच्या तक्रारीवरून अज्ञात प्रवाशाविरोधात चाळीसगाव लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाळीसगावात गाडीची तपासणी
चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर आल्यावर रेल्वेच्या कर्मचायर्‍यांनी या डब्यासह गाडीची पूर्ण तपासणी केली. ज्या डब्यात आगीचा प्रकार घडला तो डबाही तपासला. तपासणी अंती कोणताही धोका नसल्याने गाडी पुढे मार्गस्थ करण्यात आली. आग लागल्यामुळे ट्रेन साधारणतः तासाभराने गाडी भुसावळकडे रवाना झाल. संशयीत प्रवाशाचा सुरक्षा यंत्रणांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !