रावेर वनविभागाची पुन्हा अवैध डिंकावर कारवाई : संशयीत वाहन सोडून पसार


Raver Forest Department action again on illegal gum : Suspect leaves vehicle and spreads रावेर : रावेर वनविभगाने पुन्हा अवैधरीत्या डिंकाची वाहतूक करणार्‍या वाहनधारकावर कारवाई करीत 40 किलो सलई डिाक जप्त केल्याने तस्कर हादरले आहेत. केर्‍हाळा गावाजवळ केर्‍हाळा-पिंप्री रस्त्याने अवैध गौण वनउपज (सलई डिंक) वाहतूक करणारी दुचाकी येत असताना वनविभागाने कारवाई केली मात्र संशयीत दुचाकी सोडून पसार झाला.

संशयीत अंधाराचा फायदा घेत पसार
30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 बी.ए0528) व चार हजार चारशे रुपये किंमतीचा 34 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रावेरचे वनपरीक्षेत्र अधिकारी रावेर अजय बावणे, वनपाल राजेंद्र सरदार, रवींद्र सोनवणे, अरविंद धोबी, वनरक्षक रमेश भुतेकर, वाहन चालक विनोद पाटील यांनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !