पळासखेडा येथे विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा
Matrimonial rape in Palaskheda: Crime against one बोदवड : तालुक्यातील पळासखेडा येथे 23 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी एकाविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अश्लील हावभाव करीत विनयभंग
23 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, संशयित समाधान प्रकाश पारधी (पळासखेडा) याने शुक्रवारी दुपारी दोन वाजता अश्लील हावभाव व इशारे करून विवाहितेच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी समजावण्यास गेलेल्या विवाहितेच्या सासू-सासर्यांना शिविगाळ करण्यात आली. तपास हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.