केळी पिकावर फवारणीदरम्यान औषध डोळ्यात गेल्याने नंदगावच्या महिलेचा मृत्यू
A woman from Nandgaon died after the drug got into her eyes while spraying the banana crop जळगाव : केळी पिकावर फवारणी करताना विषारी औषध डोळ्यात व अंगावर पडल्याने जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील महिलेला विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शुक्रवारी सकाळी आठ वाजता जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जिजाबाई विश्वनाथ सोनवणे (55, रा.नंदगाव, जि.जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.
उपचारादरम्यान ओढवला मृत्यू
जळगाव तालुक्यातील नंदगाव येथे जिजाबाई सोनवणे या शेती काम करून उदरनिर्वाह करीत होत्या. 2 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान त्या नंदगाव शिवारातील शेतात केळीच्या पिकावर विषारी अळीनाशक औषधांची फवारणी करत असताना फवारणीचे औषध त्यांच्या डोळ्यात व अंगावर पडल्याने त्यांना विषबाधा झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी आठ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.