काय सांगता : टोपी मागवली साडेचारशे रुपयांना मात्र भूर्दंड बसला लाखाचा !
What do you say: Ordered a hat for four and a half hundred rupees, but it cost a lakh! यावल : तालुक्यातील चिंचोली येथील एका तरुणास ऑनलाईन टोपी मांगवणे चांगलेच महागात पडले आहे. 450 रुपयांची टोपी मिळाली नसताना त्याबाबत चौकशी करतांना अज्ञात भामट्याने सुरूवातीला दोन रुपये फोन पे द्वारे स्वीकारून नंतर एक लाखांची रक्कम तरुणाच्या खात्यातून लांबवली.
ऑनलाईन खरेदी करताना सतर्क राहण्याची गरज
चिंचोली येथील ज्ञानेश्वर किसन तळेले या तरुणाने एका ऑनलाईन संकेतस्थळावरून 450 रुपयांची टोपी खरेदी केली होती व ती टोपी प्राप्त न झाल्याने त्याने संबधीत कंपनीच्या ग्राहक संपर्क क्रमांकावर कॉल केल्यानंतर तुम्हाला दोन रुपये अजून द्यावे लागतील, असे तरुणास सांगून एक क्रमांक देण्यात आला व त्या क्रमांकावर फोन पे व्दारे दोन रुपये तरूणाने दिले त्या नंतर काही मिनिटात त्याच्या खात्यातून दोन वेळा प्रत्येकी पन्नास हजार कट झाल्याने तरुणाला मोठा धक्का बसला. या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.