किनगाव गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण


Abduction of a 16-year-old minor girl from Kingaon village यावल : तालुक्यातील किनगाव येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात अपहरण केल्याची घटना घडली. गावात धुणी-भांडी करण्यास मुलगी गेल्यानंतर ती घरी परतली नाही. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊनही अल्पवयीन मुलगी मिळून न आल्याने यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
किनगाव गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरी सांगून गेली की, आपण गावात धुणी -भांडे धुण्यासाठी जात आहोत मात्र ती घरी न परतल्याने सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने तिला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची
खात्री झाल्याने अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रवींद्र पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !