यावलच्या आठवडे बाजारातून मोबाईल चोरी करणारी नागपूरची टोळी अखेर जाळ्यात
The gang of Nagpur who stole mobile phones from Yaval market for weeks is finally caught यावल : शहरात शुक्रवारच्या आठवडे बाजाराच्या गर्दीचा फायदा नऊ जणांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडल्यानंतर एकाला सायंकाळी रंगेहाथ पकडण्यात आले होते. संशयीताच्या माहितीवरून त्याच्या दोन महिला सहकार्यांना अटक करण्यात आली होती. तिघा संशयतांना शनिवारी यावल न्यायालयात हजर केले असता 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तिघा संशयीतांना अखेर अटक
यावल शहरात शुक्रवारी आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत तब्बल नऊ मोबाईल चोरी झाले होते तर सायंकाळी गर्दी मोबाईल चोरी करतांना श्रीराम सरेन चव्हाण (नागपूर) यास जमावाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तर या तरूणाकडे तपास केल्यावर त्याच्या सोबत असलेल्या लाखीनाबाई परशुराम राजपूत व गीताबाई टिल्लु राजपुत या दोन महिला असल्याचे त्याने सांगितल्यानंतर त्यांनादेखील अटक करण्यात आली. शनिवारी यावल न्यायालयात न्या.एम.एस.बनचरे यांच्या समोर हजर केले असता तिघांना 20 मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.