सावखेडासीमच्या 48 वर्षीय प्रौढाचा आत्महत्येचा प्रयत्न
A 48-year-old man from Sawkhedaseem attempted suicide यावल : तालुक्यातील सावखेडासीम येथील एका 48 वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार निर्दशनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
कारण मात्र अस्पष्ट
सावखेडासीम येथील मुरलीधर सुका पाटील (48) या इसमाने आपल्या राहत्या घरी रात्री संतापाच्या भरात कुठलेतरी फवारणीचे विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यास उपचाराकरीता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ.इरफान खान, अधिपरीचारक जॉन्सन सोरटे, आरती कोल्हे, कादर तडवी आदींनी त्यांच्यावर उपचार सुरू केले असुन त्यांची प्रकृती सद्या स्थिर आहे. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला समजु शकले नाही.