जळगावातील 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या


Suicide of a 19-year-old youth in Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील समता नगरातील 19 वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विशाल हिरालाल सोनवणे (19, रा. समता नगर, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट
विशाल सोनवणे हा तरुणण आपल्या आई, आजी व मोठा भाऊ गौतम यांच्यासोबत वास्तव्याला होता व मोल-मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह भागवत होता. रविवारी दुपारी राहत्या घरात विशालने गळफास घेवून आत्महत्या केली व भाऊ गौतम सोनवणे हा घरी आल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याने संशय आल्याने त्याने दरवाजा उघडल्यानंतर विशाल याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. भावाचा मृतदेह पाहून गौतमसह नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. रामानंदनगर पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई, भाऊ गौतम, आजी व बाबा असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !