धोंडखेडा गावातील उच्चशिक्षीत तरुणाची आत्महत्या


Suicide of a highly educated youth in Dhondkheda village बोदवड :  शहरासह तालुक्यात आत्महत्येच्या घटना सातत्याने सुरूच असून तालुक्यातील धोंडखेडा गावातील उच्च शिक्षीत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. गेल्या आठ दिवसात तब्बल पाच तरुणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सुभाष पाटील (22, धोंडखेडा) असे आत्म्हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे

शेतात घेतला गळफास
धोंडखेडा येथील सुभाष पाटील (22) या उच्चशिक्षित तरुणाने शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. सुभाष हा तरुण पुणे येथे व्हेर्टनरीचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. बोदवड ोलिसात भागवत जवानसिग पाटील यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास कॉन्स्टेबल उद्धव चव्हाण करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !