भुसावळ भाजपात वाढले इनकमिंग : 38 महिलांचा पक्ष प्रवेश


भुसावळ : माजी पालकमंत्री आमदार संजय सावकारे यांच्या विशेष उपस्थितीत भुसावळ तालुक्यातील विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला भगिनींनी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चात पक्ष प्रवेश केला. यावेळी रजनी संजय सावकारे, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, अलका शेळके, महिला मोर्चा शहराध्यक्षा अनिता आंबेकर, मनीषा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व नूतन महिला सदस्यांची भारतीय जनता पार्टी सदस्यतेची ऑनलाईन नोंदणी करून घेण्यात आली.

विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा प्रवेश
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पक्षप्रवेश केलेल्या महिला या भुसावळ शहरातील विविध क्षेत्रात व सामाजिक कामात अग्रेसर असून आगामी काळात भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या आगामी दौर्‍यात अनेक महिलांचा मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा अनिता आंबेकर यांनी सांगितले. पक्षप्रवेश सोहळ्यात डॉ.छाया रुपेश देशमुख, अखिल भारतीय दिगंबर महिला समितीच्या अध्यक्षा शोभा राजने, वैशाली सैतवाल, नाभिक समाज महिला अध्यक्षा चित्रा सोनवणे, ओबीसी मंडळाच्या ललिता चौधरी, पौर्णिमा आंबेकर, बचत गटासाठी काम करत असलेल्या छाया वराडे, योगिता पाटील, दीपाली पवार, गौरी महाजन, कविता ठाकूर, पौर्णिमा सपकाळे, वर्षा पंडित, शिल्पा रडे, पुष्पा बाणाईत, रूपाली वानखेडे, मीनाक्षी कोल्हे, अरुणा पाटील, शुभांगी हेडा, पूजा पाटील, उषा सोनवणे यांच्यासह अनेक महिलांनी प्रवेश केला.


कॉपी करू नका.