जळगावात सेवानिवृत्त शिक्षिकेची धूमस्टाईल पोत लांबवली


Dhoom style texture of retired teacher extended in Jalgaon जळगाव : जेवणानंतर शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या सेवानिवृत्त शिक्षिकेच्या गळ्यातील 63 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

धूम स्टाईल चोर्‍या वाढल्या
जळगाव शहरातील जुना नशिराबाद रोडवरील सदोबा नगरात मालिनी चंद्रकांत पाटील (64) या मुलगा व सुनेसह राहतात. रविवारी रात्री 10 वाजता मालिनी यांच्यासह त्यांचा मुलगा, सून आदी पायी फिरण्यासाठी नशिराबाद रस्त्याने निघाल्यानंतर धूम स्टाईल दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी मालिनी यांच्या गळ्यातील 63 हजार रुपये किंमतीची व 21 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तोडून पोबारा केला. यावेळी आरडा-ओरड केल्यानंतर गर्दी जमा झाली मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले. सोमवारी मालिनी पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील करीत आहेत.


कॉपी करू नका.