बोदवड येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग : तरुणाला अटक


Minor girl molested in Bodwad : Youth arrested बोदवड : शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीचा प्रसाधनगृहात विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना सोमवारी पहाटे चार वाजता घडली. या ाप्रकरणी सय्यद वाजीद सय्यद रशीद (25) याच्याविरुद्ध बोदवड पोलिसात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.

तरुणाविरोधात गुन्हा
या प्रकरणी पीडीतेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित सय्यद वाजीद सय्यद रशीद (25) याने त्यांच्या अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून भेटण्यास बोलावत प्रसाधनगृहात तिच्याशी अश्लील वर्तन केले. याबाबत त्यांनी त्याला अटकाव केला असता मारण्याची धमकी देत सय्यद त्या ठिकाणाहून पसार झाला. याबाबत पीडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सय्यदविरुद्ध पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.

 


कॉपी करू नका.