यावल-चोपडा रस्त्यावर डंपर-ट्रकमध्ये अपघात : चौघे गंभीर जखमी
Accident in dumper-truck on Yaval-Chopda road: Four seriously injured यावल : यावल-चोपडा रस्त्यावर वाघोदा गावाजवळ भरधाव वेगात येणार्या वाळुच्या एका डंपरने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले. जखमींना तातडीनपे यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले तर यातील तिघांना जळगावी हलवण्यात आले आहे. अपघात प्रकरणी वाळूच्या डंपर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध वाळू वाहतूक जोमात
अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर चोपडा रस्त्यावर वाघोदा गावाजवळ रविवारी रात्री भरधाव वेगाने वाळूचे डंपर घेऊन चालक नितीन सुरेश कोळी (डांभूर्णी) हा येत असताना यावलकडून चोपडा शहराकडे कंटेनर (क्रमांक आर. जे. 09 जी.डी.3658) घेवुन चालक मोहिनोद्दिन शेख (मुंबई, मुंब्रा) हे जात असताना वाळुच्या डंपरने भरधाव वेगात कंटेनरला धडक दिल्याने मोहिनोद्दिन शेख (रा. मुंबई, मुंब्रा), डंपर चालक नितीन सुरेश कोळी, गिरीश बापू कोळी व प्रशांत पुरुषोत्तम पाटील (तिघे रा.डांभूर्णी) हे जखमी झाले. चौघा जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉ. सचिन देशमुख, अधिपरीचारीका नेपाली भोळे, सुमन राऊत, अमोल अडकमोल आदींनी उपचार केले. यातील तिघांना पुढील उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले तर या अपघात प्रकरणी पोलिस कर्मचारी मुस्तफा तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात वाळूच्या डंपर चालक नितीन कोळी व डंपरचा अज्ञात मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहेण