नशिराबादच्या तरुणाची वाहन विक्रीच्या माध्यमातून सहा लाखात फसवणूक : एरंडोलच्या इसमाविरोधात गुन्हा
Nashirabad youth defrauded of six lakhs through vehicle sale : Crime against Isma of Erandol जळगाव : सहा लाखात वाहन खरेदी करून दोन महिन्यात पैसे देण्याच्या बहाण्याने एरंडोलच्या आरोपीने नशिराबादमधील तरुणाची पाच लाख 80 हजारात फसवणूक केल्याची घटना नशिराबाद येथे घडली. या प्रकरणी सोमवारी एरंडोल येथील पपिंदरसिंग सरबनसिंग सैन उर्फ मनी (सरस्वती कॉलनी, एरंडोल) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
20 हजारांचे टोकन देत नेले वाहन
गणेश नथ्थू चव्हाण (40, नशिराबाद) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्याकडील बोलेरो (एम.एच. 20 सी.टी.6964) सह एरंडोल शहरातील पपिंदरसिंग सरबनसिंग सैन ऊर्फ मनी यांनी खरेदी करण्याच्या बहाण्याने सहा लाखात व्यवहार निश्चित केला व टोकनपोटी 20 हजार रुपये दिले तसेच उर्वरीत दोन महिन्यात देतो म्हणून खरेदी करारनामा करून दिला मात्र दोन महिन्यानंतर रक्कम मागितल्यानंतर शिविगाळ करण्यात आली तसेच खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी चव्हाण यांनी सोमवारी नशिराबाद पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.